Tuesday, February 1, 2022

मुलुंड मध्ये महाराष्ट्राचे राज्यमंत्री विश्वजित पतंगराव कदम यांच्या हस्ते, कडेगाव तालुका सेवा संघाच्या नूतन कार्यालयाचे, उद्घाटन सोहळा अतिशय भव्य स्वरूपात पार पडला.





मुलुंड : दिनांक  //२०२२ रोजी मुलुंड मध्ये महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार विश्वजित पतंगराव कदम यांच्या हस्ते, कडेगाव तालुका सेवा संघ मुंबई यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सोहळा अतिशय भव्य स्वरूपात पार पडला. सदर सोहळ्यामध्ये विश्वजित पतंगराव कदम यांनी कडेगाव तालुका सेवा संघास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सर्व प्रकारची मदत कडेगाव तालुका सेवा संघास कडेगाव तालुक्यातील जनतेला नेहमीच कदम कुटुंबियाने केलेली आहे यापुढेही करत राहू असे आश्वासन दिले.

या कार्यक्रम प्रसंगी ठाण्यातील आमदार रविंद्र फाटक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव मनोज शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी कडेगाव तालुका सेवा संघाचे अध्यक्ष उमेश महाडिक, कार्याध्यक्ष गणपत सेठ सावंत, उपाध्यक्ष निवृत्ती मस्के, सचिव सुरेश महाडिक, अनिल जरग, बाळासाहेब जाधव, हनुमंत ढाणे, अनिल सूर्यवंशी, किसनराव उथळे सर्व संचालक मंडळाने मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवासंघाचे खजिनदार सतीश माने यांनी केले.

No comments:

Post a Comment